
Reporter- महेंद्र शिरसाठ नेवासा
श्री ज्ञानदेव कडू शिरसाठ यांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगरगाव मध्ये आदरणीय श्री ज्ञानदेव कडू शिरसाठ यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला 👏
विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व बालचित्रकला स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आल्या 🏆 तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वही व पेन देऊन प्रोत्साहन देण्यात आले ✍️
या संपूर्ण उपक्रमासाठी त्यांनी स्वतःहून सुमारे ₹5000 खर्च करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे मोठे कार्य केले 🌟
अशा सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तीचे मनःपूर्वक आभार 🙏
थोर व्यक्तींची
जयंती, पुण्यतिथी अशा उपक्रमांद्वारे साजरी केल्यास त्यांच्या महान विचारांची ओळख विद्यार्थ्यांना होईल व त्यांना योग्य दिशा आणि प्रोत्साहन मिळेल 📚✨
शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगरगाव यांचे कडून आदरणीय ज्ञानदेव कडू शिरसाठ यांचे खूप खूप आभार व धन्यवाद🙏









